कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते हिंगणघाट भारत विद्यालय येथे वर्गखोल्यांचे भूमिपूजन

0
658

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9850833516

कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते हिंगणघाट भारत विद्यालय येथे वर्गखोल्यांचे भूमिपूजन

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट अंतर्गत भारत विद्यालय हिंगणघाट येथे शैक्षणिक सुविधांची गरज लक्षात घेता खासदार रामदास तडस यांच्या निधीतून वर्गखोल्यांचे भूमिपूजन आज दिनांक 12/01/2021 ला करण्यात आले. या अंतर्गत वर्ग खोल्यांच्या बांधकाम करीता 20 लक्ष रुपयांचा निधी खासदार निधीतून देण्यात आलेला आहे. त्यामधून भारत विद्यालय हिंगणघाट येथे वर्ग सुसज्ज अशा वर्गखोल्यांची निर्मिती भविष्य काळामध्ये होणार असून यामधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने भौतिक सुविधा निर्माण होणार आहेत.या वर्गखोल्यांचे भूमिपूजन आज *आमदार समीर कुणावार* यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे *अध्यक्ष मा. गोकुलदासजी राठी, संस्थेचे सचिव मा. रमेशजी धारकर, मा. विजयजी अग्रवाल, मुख्याध्यापक बळीरामजी चव्हाण, पर्यवेक्षक राजेंद्रजी उरकांदे, शिक्षक दत्ताजी भांगे, किशोरभाऊ चवरे* तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी रुंद इत्यादी असंख्य शिक्षक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here