बामणवाडा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत नवीन उमेदवारांना पसंती
राजुरा /प्रतिनिधी

बामणवाडा ग्रामपंचायती च्या निवडणुकीत अनेक उमेदवार पद भोगले असून तेही निवडणुकीत उभे असून या निवडणुकीत युवक उमेदवारांना पसंती असल्याचे मतदार बोलून दाखवीत असून काही उमेदवार दहा पंधरा वर्षांपासून निवडून येत असून
मागील पंधरा वर्षांपासून फक्त राजकारण करीत असून निवडून येण्यासाठी युवकांची दिशाभूल करीत असल्याचे मत युवक मांडताना दिसत आहेत.
वॉर्ड नं एक मध्ये अनेक अडचणी असून या वॉर्डातील गरीब वर्गाकडे कमालीचे दुर्लक्ष काही पदाधिकारी केल्याने या वॉर्डातील नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. आता युवक उमेदवार उभे असल्याने त्यांना पसंती असल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामपंचायत च्या कामात नवीन पिढीचा सहभाग असवा जेणेकरून गावा च्या विकासात युवा पिढीचाही सहभाग असेल असे मत नागरिक मांडताना दिसत असून आता नवीन पिढीच्या हाती सत्ता देण्याचा विचार नागरिक करीत आहेत.
या निवडणुकीत परिवर्तन होण्याची शक्यता दिसत असल्याने जुन्या पिढीच्या उमेदवारांचा राजकारण संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिक नवीन पिढीच्या उमेदवारांना पसंती दर्शवित असल्याने या निवडणुकीत परिवर्तन होण्याची शक्यता दिसत आहे.