महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारीत पहिल्या जागतिक महाकाव्यसंग्रात होणार युवा कवि आदित्य आवारीच्या कवितेची नाेंद !

0
278

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारीत पहिल्या जागतिक महाकाव्यसंग्रात होणार युवा कवि आदित्य आवारीच्या कवितेची नाेंद !
🟨🟢💠🟣राजूरा🟣🟨🟢किरण घाटे🛑🟢सन
२०२१ मधील कवींच्या कवितांचा समावेश असणारा जगातील पहिलाच ‘महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ’ लवकरच प्रकाशित हाेत असुन या ग्रंथात चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणां-या राजुरा येथील १७ वर्षीय नवाेदित कवी आदित्य आवारी यांच्या ‘बाबासाहेब’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. हा महाकाव्यग्रंथ शब्ददान प्रकाशन नांदेड मार्फत येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित होणार असल्याची माहिती सदरहु ग्रंथाचे संपादक प्रा.अशोककुमार दवणे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकातुन दिली.
🟨🟢🌀जिल्ह्यातील अन्य कवींच्या कवितांचा देखील समावेश ह्या महाकाव्यग्रंथात करण्यात आला आहे.
आदित्यचे साहित्य विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले असून २०२० साली अ.भा.म.साहित्य संमेलनासाठी देखील निवड झाली होती व विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
🟨🟣🌀💠भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदान फार अमूल्य व मोठे असुन स्वलिखित कवितेच्या माध्यमांतून त्यांच्या कार्याचा गौरव मला करता येणे हे मी माझे भाग्य समजतो. सामाजिक बदलासाठी लिखाण करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मला मिळाली अशी प्रतिक्रिया युवा कवी आदित्य आवारी यांनी या प्रतिनिधी साेबत बाेलतांना व्यक्त केली .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here