दृष्टिहीन कैलास चा आत्महत्येचा प्रयत्न

0
1604

दृष्टिहीन कैलास चा आत्महत्येचा प्रयत्न

गोंडपिपरी तालुक्यातील घटना

 

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील दृष्टिहीन कैलास तुकाराम चंद्रगिरीवार वय (45) याने आज सकाळी १० च्या सुमारास आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
वढोली येथील कैलास याचा सुखी संसार सुरू होता हमाली शेतमजुरी करून कुटुंबाचा गाळा तो चालवायचा त्याला दारूचे व्यसन लागले.दारूच्या नशेत तो नेहमी असायचा.हातावर आणून पानावर खाणे अशी त्याची अवस्था होती.त्याची पत्नी ही मुलगा,मुलगी ,वृद्ध सासरे यांचा विचार करून मोल मजूरी करू लागली.शाळा शिकायच्या वयात खेळायच्या त्याची मुलगी छकुली ही देखील वयाच्या १० वर्षांपासून लोकांच्या घरचे धुनी भांडी करायला लागली.तरी सुद्धा कैलास ला कर्तव्याची जाणीव न्हवती.अशातच २०१४ साली त्याची पत्नी सुषमा स्वयंपाक बनवताना आग लागली व त्या आगीत तिचा मृत्यू झाला .वर्षभरात कैलास ची तब्बेत दारूमुळे खालावली त्यानी दृष्टी गमावली वेळेवर उपचाराअभावी कायमचे अंधत्व आले. होत्याच न्हवत झालं.व कुटुंबाचा भार १० वर्षीय मुलीवर आला घरात अंध वडील,वृद्ध आजोबा कुणी नातलग नाही.ती गेल्या ६ ते ७ वर्षापासून लोकांच्या घरी धुनी भांडी करून घराचा गाळा चालवत आहे.अशातच आज कुटुंबाला भार होत आहो म्हणून नैराशेच्या भावनेतून ब्लेड ने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here