गोवरी येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती”महिला शिक्षण दिन” उत्साहात.

0
561

गोवरी येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती”महिला शिक्षण दिन” उत्साहात.
राजुरा(गोवरी):- आज दि.०३/०१/२०२१ ला सकाळी ११.०० वाजता संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार गोवरी येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती “महिला शिक्षण दिन”म्हणून मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.त्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रा.दिनेश घागरगुंडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.तसेच सावित्रीमाई किती थोर होत्या आणि त्यांनी स्त्रियांसाठी कोण कोणती महान कार्य केले हे आपल्या मनोगतातून मांडत त्यांचे विचार अंगिकारत विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन केले.तसेच संबुध्द पंचशील मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश कासवटे, सुमेश कोल्हे, बुद्ध हर्ष कासवटे,नयन चूनारकर,सिद्धार्थ कासवटे,सौरभ करमनकर,मयूर कासवटे,नाना कासवटे, लोभेश करमनकर,अमोल डंभारे, संकेत घागर्गुंडे,अनमोल घागरगुंडे,महिला सदस्य,तक्षशिला स्वच्छता समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here