शैक्षणिक सत्र 2020-21 करीता महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या अंतिम तिथी बाबत विद्यार्थ्यांना सूचना

0
447

शैक्षणिक सत्र 2020-21 करीता महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या अंतिम तिथी बाबत विद्यार्थ्यांना सूचना

15 जानेवारी पर्यंत प्रवेशाची अंतीम तिथी
विद्यार्थी हितासाठी कुलगुरूंचा विद्या परिषदेच्यावतीने महत्वपूर्ण निर्णय
संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ _(नॅकद्वारा ‘अ’ मानांकन प्राप्त)_

प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे

अमरावती – : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधित विद्याथ्र्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील विद्याथ्र्यांना सर्व सत्र, वर्षातील सर्व पदवी, पदव्युत्तर (पदवी व पदविका) अभ्यासक्रमातील सत्र 2020-21 करीता प्रवेश देण्याची अंतिम तिथी दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतू, कोव्हीड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षांचे आयोजन व निकालावर परिणाम झाल्याने आणि काही विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक विभागात, महाविद्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरुच आहे. त्याबाबतच्या स्थितीचा विचार करता विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्यावतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा 2016 च्या कलम 12(7) अंतर्गत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रवेश देण्यासाठी अंतिम तिथीत वाढ केली असून ती आता दि. 15 जानेवारी, 2021 करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना विद्यापीठ राजपत्र भाग-दोनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे..
तरी सर्व संबंधित विद्याथ्र्यांनी ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा. ज्या अभ्यासक्रमांचे प्रवेश शासनाच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे केले जातात, त्यांना सदर मुदतवाढ लागू राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here