राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त

0
216

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : राज्य उत्पादन शुल्क राजुरा कार्यालयाच्या भरारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा हरदोना-राजुरा मार्गावर पाळत ठेवून बोलेरो महिन्द्रा चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 बीजी 2592  या  वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रन्डच्या 180 मिलीच्या एकुण 25 बॉक्स व वाहन जप्त केले. वाहनासह मुददेमालाची एकुण अंदाजे किंमत रूपये सहा लाख वीस हजार आहे.

 सदर गुन्ह्यातील आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असुन संबंधीत आरोपीचा फरार घोषित करून त्याच्या विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती पाटील व त्यांची चमू करीत आहे .

माहे डिसेंबर महिन्यामध्ये चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क, विभागाने 68 गुन्ह्यात 50 आरोपींना अटक करून एकुण 33 लाख 76 हजार रूपयाचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे, असे राज्य उत्पादन शुल्क, राजुराचे निरीक्षक मारूती पाटील, यांनी कळविले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here