गेल्या अनेक महिन्यापासून मोहता मिल कामगार पगारापासून वंचित

0
295

गेल्या अनेक महिन्यापासून मोहता मिल कामगार पगारापासून वंचित

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दूरध्वनीद्वारे केला संपर्क

हिंगणघाट । अनंता वायसे

29 डिसेंबर 2020 : गेल्या अनेक दिवसापासून मोहता मिल कामगार अडचणीत सापडला आहे म्हणून आज सर्व कामगारांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या समस्या सांगितल्या व या अनुषंगाने कामगार व संबंधित अधिकारी तसेच मिल व्यवस्थापक या सर्वांच्या उपस्थितीत बैठक लावून कामगारांच्या या गंभीर प्रश्नाचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे असे त्यावेळी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असताना मंत्रिमहोदयांना सांगितले.
फोल्डिंग आणि प्रोसेसिंग या खात्यातील कामगारांचा ऑक्टोंबर 2020 या महिन्यापासून पगार झाला नाही, डिसेंबर 2019 गेल्या दोन वर्षांपासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग हे खाते मनमर्जी बंद केलेले आहे त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही, झालेल्या बैठकीत कामगार कमिशनर नागपुर यांनी कामगारांना पूर्ण पगार देण्याचे आदेश दिले असतानासुद्धा त्यांना 16 डिसेंबर 2019 पासून बेकायदेशीर लेआॅफ (अर्धा पगार) देत आहे जेकी पूर्ण पगार देण्याचे आदेश आहे.
अन्यथा मोठा मिल कामगारांचे म्हणणे असे आहे की मिल चालू ठेवा नाहीतर कायदेशीर व्ही.आर.एस देण्यात यावे.
या सर्व मोहता मिल कामगारांच्या मागण्या त्वरित प्रशासनाने सोडविण्यात आल्या नाही तर कामगार सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी मोहता मिल व्यवस्थापनाची व प्रशासनाची राहील नाही तर संपूर्ण कुटुंबा सहित आत्मदहन करावे लागेल याव्यतिरिक्त कामगारांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्रस्त आहोत तरी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी असे आव्हानही कामगारांच्या वतीने करण्यात आले.
त्यावेळी संजय रहाटे, सुनील देवताळे ,गजानन धात्रक, नाना हेडाऊ, नारायण शहारकर,विष्णू पतरु, राजू भोंडे, दिलीप डहाके, चंद्रभान मायकलकार,हर्दिप काळे, दीपक फरदे इत्यादी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here