गोंडपिपररी बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याकडून ग्राहकाची अवहेलना मनमानी कारभार

0
681

*बँक कर्मचाऱ्याकडून ग्राहकाची अवहेलना*

*गोंडपिपरीतील बँक ऑफ इंडियाचा मनमानी कारभार*

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)महिना भरला की पगार खात्यात जमा होतो या आत्मविश्वासाने बँक कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करत कार्यात कामचुकारपणा करतात असाच प्रकार गोंडपिपरी येथील बँक ऑफ इंडिया मधील मुन कर्मचाऱ्यांनी घळवला आहे. मुन विरुद्ध अजित जैन यांनी सहकार्य करणाऱ्यांसह निलंबित करण्याची मागणी पत्रपरिषदेत केली आहे. ग्राहकाच्या सेवा सुरक्षेसाठी गोंडपिपरी तालुक्यात बँक ऑफ इंडियाची शाखा स्थापन झाली. याच बँकेचे तालुक्यातील सर्वात मोठे बँक असे नावलौकिक आहे. असे असताना मात्र मागील काही दिवसांपासून याच बँकेतील काही कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाचे अवहेलना होत असल्याचा प्रकार अजित कुमार जैन यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणला आहे.
आर्थिक व्यवहाराचे देवाणघेवाण सुरळीत व्हावे यासाठी शासन स्तरावरून कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या. याच माध्यमातून अनेकांनी नेट बँकिंग सारखे व्यवहार करण्यास सुरुवात केली. गोंडपिपरी येथील अजित कुमार जैन या वरिष्ठ व्यापाराने बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून नेहमी NEFT चे व्यवहार करीत होते. आता मात्र हेच व्यवहार करण्यास बँकेत गेले असता येथील कर्मचाऱ्यांनी आमच्या बँकेतून असले व्यवहार होत नसल्याने ज्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल त्याच बँकेतून हे व्यवहार केल्या जात असल्याचे सांगत हुज्जत घातली. सदर व्यापाराचे बँक ऑफ इंडिया शाखा वढोली येथे चालू खाते उघडले आहे. याअगोदर मात्र हेच व्यवहार गोंडपिपरी येथूनच रीतसर पार पडत होते मात्र हल्ली कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बँकिंग व्यवहार करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. खाते कुठल्याही ही शाखेत असले तरी ऑनलाइन व्यवहार या अगोदर याच बँकेतून केले असून आता मात्र हे कर्मचारी कामचुकारपणा करीत नाहक त्रास देत असल्याची माहिती अजित कुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here