शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईत झाली बैठक!

0
442

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईत झाली बैठक!

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याचे ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देश !
किरण घाटे

चंद्रपूर:-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे पाच महिण्यांपासून थकीत असलेले वेतन अदा करण्यात यावे या करीता आ. किशोर जोरगेवार यांचा सातत्याने प्रयत्न सुरु होता. परिणामी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबई मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेत नाव प्रस्ताव पाठवून जानेवारी महिण्याच्या पहिला आठवड्यात सदर कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या कर्मचा-यांची कोरोना काळातील सेवा विसरता येणार नाही. असे असले तरी या कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. मागील पाच महिण्यांपासून येथील कर्मचा-यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे हे वेतन तात्काळ देण्यात यावे या करिता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते.

या बाबत संबधित विभागाशी त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. जुन्या डिनने वेतनासंदर्भात प्रशासकीय मान्यता न घेतल्याने पगार रखडले असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

त्यामूळे आता नव्याने प्रस्ताव शासनाकडे पाठवावे असे निर्देश देत प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित मंजुरी देऊन पगार करावेत असे आदेश या बैठकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहे. आता येथील कंत्राटी कर्मचा-यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थकीत वेतन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे बाेलल्या जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here