भिसी येथे नगरपंचायत स्थापनेबाबत शासनाने मागितला अहवाल

0
452

भिसी येथे नगरपंचायत स्थापनेबाबत शासनाने मागितला अहवाल

आमदार बंटी भांगडीया यांचे प्रयत्नांनी नगरपंचायत स्थापन करण्याचा शासनस्तरावर वाढल्या हालचाली
आशिष गजभिये

चिमूर :-चिमूर तालुक्यातील भिसी येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबत चिमूर विधानसभा क्षेत्रांचे आमदार बंटी भांगडीया यांचे प्रयत्नांनी भिसी नगरपंचायत स्थापन करण्याच्या शासनस्तरावर हालचाली वाढल्या असून जिल्हाधिकारी कार्यालय चंदपूर यांना सविस्तरपणे अहवाल सादर करण्याचे पत्र नगरविकास विभागाने दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी काढले असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनीही तहसीलदार चिमूर , संवर्ग विकास अधिकारी चिमूर ,नगररचनाकार कार्यालय चंद्रपूर यांच्या कडून पत्र देत अहवाल मागितला असून परिपूर्ण अहवाल शासनाने मागितला असल्याने नगरपंचायत निर्मिती कडे भिसीची वाटचाल होत आहे.पण सध्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक लागली असून निवडणूक झाल्यावर नगरपंचायत निर्मिती होईल की निवडणुकीला स्थगिती मिळेल याकडे लक्ष वेधून घेत आहे .

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२, यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक क्र.एमयुएन-२०१७/प्र.क्र.२१/नवि-१८ दिनांक : १८/१२/२०२०. नुसार जिल्हाधिकारी,चंद्रपूर. यांना पत्र पाठवले असून त्यात विषययाकीत केले आहे की भिसी ता. चिमूर, जि. चंद्रपूर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करणेबाबत.अनुसरून पूर्वीचे जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाच्या पत्र संदर्भ आपले पत्र क्र. कार्या-१०/नविशा/अका/कावि/ २०१७/४९६, दिनांक १२/४/२०१७ चे पत्र व परत मा.श्री. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया, विधानसभा सदस्य, जि.चंद्रपूर यांचे दिनांक ८ डिसेंबर, २०१९ रोजीचे पत्र व त्यासोबतची सहपत्रे सोबत जोडली आहेत. सदर पत्रान्वये, भिसी (ता.चिमूर, जि.चंद्रपूर) या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबत विनंती केली आहे. यासंदर्भात आपल्या संदर्भाकित दिनांक १२/४/२०१७ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे अवलोकन केले असता त्यामध्ये भिसी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या संपूर्ण सव्हें क्रमांकाची यादी सादर केली आहे. कोणत्याही ग्रामीण भागाचे नागरीकरण करताना केवळ नागरिकरणात समाविष्ट असलेल्या क्षेत्राचा समावेश करणे अपेक्षित आहे. सबब, या अनुषंगाने खालील बाबी तपासून सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा, असे कळविले
असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतूदीनुसार प्रस्ताव तपासण्यात यावा.सदर प्रस्ताव सादर करतांना १९६५ च्या अधिनियमातील तरतूदीनुसार गावांची लोकसंख्या सन-२०११ च्या जणगणनेनुसार, अकृषिक रोजगाराची टक्केवारी, क्षेत्रफळ, सर्व्हे क्रमांक, जोडपत्र-“अ” व “ब” आणि नकाशा इत्यादी बाबींसह प्रस्ताव सादर करावा.प्रस्तावित भिसी नगरपंचातीमध्ये समाविष्ट असलेले नागरिकरण झालेले सव्हें क्रमांक, गावठाण क्षेत्र, अकृषिक असलेले सर्व्हे क्रमांक तसेच मंजूर ले-आऊट स्व्हे क्रमांक यांची स्वतंत्र यादी व निव्वळ शेती क्षेत्र असलेल्या सर्व्हे क्रमांकाची स्वतंत्र यादी आणि एकूण क्षेत्रफळ. अशी सविस्तरपणे माहिती व अहवाल नगरविकास विभागाचे वि.ना.धाईजे कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.याचे पत्र जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना अहवाल मागितला आहे .

त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनीही आपले जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय (नगर विकास शाखा) क्रमांक कार्या-1(नविशाइट 5भिसी/2020/ दिनांक १८डिसेंबर २०२० ला पत्र देऊन तहसिलदार, चिमूर ,संवर्ग विकास अधिकारी, पं.स. चिमूर , सहाय्यक संचालक,नगर रचना,चंद्रपर यांच्या कडून पत्र देत अहवाल मागितला असून परिपूर्ण अहवाल शासनाने मागितला असल्याने नगरपंचायत निर्मिती कडे भिसीची वाटचाल होत आहे.पण सध्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक लागली असून निवडणूक झाल्यावर नगरपंचायत निर्मिती होईल की निवडणुकीला स्थगिती मिळेल याकडे लक्ष वेधून घेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here