वंचित बहुजन आघाडीची एक दिवसीय पूर्व विदर्भ स्तरीय कार्यशाळा चंद्रपूरात संपन्न

0
484

वंचित बहुजन आघाडीची एक दिवसीय पूर्व विदर्भ स्तरीय कार्यशाळा चंद्रपूरात संपन्न ! अनेकांनी लावली हजेरी !
किरण घाटे
चंद्रपूर:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने( पूर्व विदर्भ विभागीय )चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महिला आघाडी,युवा आघाडी व सर्व कार्यकारणी मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक महत्वपूर्ण संयुक्तिक कार्यशाळा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर,यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड .धनराज वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवार दि .२१डिसेंबरला सकाळी ११वाजता चंद्रपूरातील डाँ .बाबासाहेब आंबेडकर सभाग्रूहात पार पडली .आयोजित या कार्य शाळेला चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सदस्य माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सदरहु कार्यशाळा ही सकाळी ११ते दुपारी ५वाजेपर्यंत चालली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here