राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सत्कार

0
323

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सत्कार

पोंभुर्णा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यात महिला आता सक्षम झाली आहे.देशासहित गावचा कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळत आहेत.यांच कर्तुत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करुन त्यांना सलाम केला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील कर्तुत्ववान महिला लता उमाजी लांडे,निरंजना विकास मडावी,यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील महिला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहत आहेत.हे क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी महिलांना सत्तेमध्ये समान वाटा देऊन आणखी विस्तृत केले. घर सांभाळून महिला आज सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे त्यांच्या या योगदानाचा आज सन्मान झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष विजय ढोंगे यांनी म्हटले आहे.मुर्लीधर कोडापे, कार्याध्यक्ष सुमित्रा जुमानाके,गौतम तावाडे,विलास भंडारे,मिठाईलाल बांबोडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here