न्यू कॉटन मार्केट ते पाठ्यपुस्तक मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर …

0
443
  1. न्यू कॉटन मार्केट ते पाठ्यपुस्तक मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर …

आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विकासकामाचे भूमिपूजन …

प्रतिनिधी सदानंद आ खंडारे

अमरावती : निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासह विकासकामांच्या पूर्व नियोजित आराखड्यांवर अंमल करण्याला घेऊन गेल्या मार्च २०२० मधील अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या कडे अनुदान मिळण्यासाठी नियोजित विकास कामांचा प्रस्ताव सादर केला . दरम्यान निधीच्या उपलब्धतेला घेऊन आ. सुलभाताई खोडके यांनी राज्य शासनाकडे सातत्याने प्रयत्न चालविले . याची फलश्रुती म्हणून अमरावतीच्या विकासासाठी पर्याप्त निधी मंजूर झाल्याने महापालिका क्षेत्रातील अर्धवट व रखडलेल्या कामांनी गती धरली असून विकासपर्व नांदत असल्याचे दिसत आहे . अशातच महानगर पालिकांना मूलभूत सोयी सुविधांचा विकास कामांसाठी प्राप्त विशेष अनुदानांतर्गत अमरावती महापालिका क्षेत्रातील न्यु कॉटन मार्केट सहकार नगर चौक ते पाठ्यपुस्तकालया पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला . या कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक ११ डिसेंबर रोजी आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी आ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामाच्या नामफलकाचे अनावरण करण्यासह कुदळ मारीत भूमिपूजनाची औपचारिकता साधली . महानगर पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेतून तब्बल ५ कोटी रुपये इतक्या निधीतून न्यु कॉटन मार्केट सहकार नगर चौक ते पाठ्यपुस्तकालया पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासह नाली बांधकाम , पेविंग ब्लॉकच्या बाजू पट्ट्याचे काम होणार असल्याने हा अत्यंत रहदारीचा मार्ग कात टाकणार आहे . सदर मार्ग हा अनेक लोक वसाहती , शाळा ,महाविद्यालय आदी भागाशी जोडला गेला असून गत काळात मार्गाची झालेली दुरावस्था व अर्धवटपणे रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत असे . सदर बाबीला गंभीरतेने घेऊन आ. सुलभाताई खोडके यांनी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी खेचून आणला आहे . भूमिपूजनाप्रसंगी आ. सुलभाताई खोडके यांनी केल्या जाणाऱ्या रस्ते बांधकामा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत सदर काम गतीने व दर्जेदार होण्याला घेऊन सूचना केली . दरम्यान स्थानिक नागरीकांकडून देण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करण्यासह जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले सर्वोतोपरी प्राधान्य राहील, असा विश्वास आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला . या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आ. सौ सुलभाताई खोडके यांच्यासह सार्वजनिक बंधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.झेड.काझी, सहाय्यक अभियंता व्ही.बी. बोरसे , नगरसेवक प्रशांत डवरे , मंजुश्री महल्ले , धीरज हिवसे , प्रशांत महल्ले , यश खोडके, कंत्राटदाराचे प्रतिनिधी सावन वाघमारे ,राजश्री जठाळे , प्रशांत पेठे , बंडू निंभोरकर , आशिष ठाकरे , शरद जवंजाळ , सारंग देशमुख , बंडू कथलकर , स्मित माथुरकर , मदन जयस्वाल , नितीन भेटाळू , सचिन रहाटे , दिलीप साखरे , प्रतापराव देशमुख , प्रवीण भोरे , धीरज श्रीवास , नट्टू महाराज , मनीष पावडे आदी सहित जेष्ठ नागरिक , महिला भगिनी , युवक बांधवांसह स्थानीय नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here