*ग्राम पंचायत मध्येच मिळणार आता दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र*
विकास खोब्रागडे

दारिद्र्य
रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना प्रमाणपत्रासाठी पंचायत समिती कार्यालय मध्ये जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना पैसा व वेळचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.सरकारने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन दारिद्य्र रेषेखाली प्रमाणपत्र आता स्थानिक ग्राम पंचायत मधील ग्रामसेवक कडून करून देण्यात घेण्यात यावी असे परिपत्रक काढले आहे.या पूर्वी सदर प्रमाणपत्र कुटुंबातील येणाऱ्या सदस्यांना पंचायत समिती च्या सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र देण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता वेळेवर प्रमाणपत्र मिळत नव्हते. दरम्यान हे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन ग्रामविकास विभागाला देण्यात आले होते यावर सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्याच्या तक्रारी व निवेदन लक्षात घेऊन निर्णयात बदल केले आहे. आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलमान्वये दाखला देण्यासाठी ग्रामसेवक यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त केली आहे .सहाय्यक गटविकास अधिकारी यांना प्रथम अपीलीय प्राधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना द्वितीय अपील अधिकारी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे होणारा खर्च वेळेचा उपयोग कमी होऊन गावातील ग्रामपंचायत कार्यालय दाखला मिळण्यात येणार आहे.