जनसंपर्कात सातत्य ठेवणारा लोकप्रतिनिधी….. लोकप्रिय आमदार डॉ. देवरावजी एम. होळी यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दीक शुभेच्छा.

0
514

जनसंपर्कात सातत्य ठेवणारा लोकप्रतिनिधी…..
लोकप्रिय आमदार डॉ. देवरावजी एम. होळी यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दीक शुभेच्छा.

गडचिरोली प्रतिनिधी

गडचिरोली तालुक्यातील रायपुर या आदिवासीबहुल, छोट्याशा खेड्यात एका गरीब माडिया कुटूंबात जन्माला आलेले,डॉ. होळी साहेब संघर्ष, जिद्द, चिकाटीने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून MBBS चे शिक्षण पूर्ण केले.समाजाची सेवा करण्याचा ध्यास अंगी सुरवातीपासून असलेले होळी साहेब यांनी चामोर्शी तालुक्यात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्य केले.हे करत असताना गोरगरीब रुग्णाच्या सेवेसाठी त्यांनी तत्परतेने कार्य केले समाजाचे ऋण फेडण्यासाठी डॉक्टरी व्यवसायाच्या माध्यमातून तर त्यांनी कार्य केले पण सोबतच सामाजिक उपक्रम ही राबविले त्यामुळे जनमानसात डॉक्टर साहेबांची लोकप्रियता वाढीस लागली.आणि त्यांचा समाजसेवेचा आवाका बघता लोकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यच्या राजकारणात एक अमिप छाप उमटविली.आणि सतत जनतेच्या संपर्कात राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली.

… एकदा आमदार झाले की मतदार संघातील जनतेशी संपर्क न ठेवता मुंबई दिल्ली च्या वाऱ्या करायच्या आणि निवडणुकीचे दिवस आले की लोकांच्या गाठीभेटी घायच्या अशी आमदारांची जनमानसात प्रतिमा आहे. परंतु याला अपवाद लोकप्रतिनिधी म्हणजे गडचिरोली मतदार संघाचे आमदार आणि विधानसभेचे उमेदवार डॉक्टर देवराव होळी. . डॉक्टरी पेशातील माणुसकी साहेबांनी जोपासली गोरगरीब रुग्णाशी आपुलकी ने साहेब वागत.त्यामुळे साहेबांची लोकप्रियता वाढत गेली आणि2014 च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी साहेबांना मिळाली. तेव्हापासून त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी सतत प्रयत्न केले लोकांच्या सुखदुःखा त सहभागी झाले. कोणत्याही गावात गेल्यानंतर आपुलकीने खांद्यावर हात ठेवून समस्या विचारणारा व सोडविणारा आमदार यापूर्वी या क्षेत्रातील जनतेने कधी पाहिला नाही. गावातील छोटासा कार्यकर्ता ही साहेबांना फोन करून बोलतो आणि साहेबही आपला आमदारकीचा थाट न दाखविता त्या कार्यकर्त्या चा फोन उचलतो.इतका जनतेसाठी केव्हाही उपलब्द्ध होणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख साहेबांनी निर्माण केली.त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून दिले.एका हाकेला धावून जाणारे होळी साहेब यांना जनसेवा करण्याची संधी अशीच मिळो ही सदिच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना हीच जन्म दिनी मनःपूर्वक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here