दोन दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलिसिस मशिन दोन दिवसात सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

0
398

दोन दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलिसिस मशिन दोन दिवसात सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुविधांची पाहणी, मशीन सुरु होई पर्यंत क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये उपचार करण्याच्या सुचना

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोई सुविधांची पाहणी केली. यावेळी डायलिसिस मशीन मागील एक महिण्यापासून बंद असल्याचे लक्षात येताच सदर मशीन दोन दिवसात सुरु करण्याचे निर्देश आ. किशोर जोरगेवार यांनी दिले असून मशिन सुरु होई पर्यत संबधित आजाराच्या रुग्णांची क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये तपासणी करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, निवृत्ती राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे उपविभागीय अभियंता, राजेश चव्हाण, सहाय्यक अभियंता, विवेक अंबुले, यंग चांदा ब्रिगेडचे विलास सोमलवार, हरमन जोसेफ यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यासह – जिल्हा बाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मात्र येथील किडणीच्या आजाराची डायलिसिस मशिन बंद आहे. त्यामुळे किडणीचा आजार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहण करावा लागत होता. तसेच नाईलाजास्तव सदर रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामूळे त्यांना आर्थिक भुर्दड सोसावा लागत होता. दरम्याण आज आ. किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. आ. जोरगेवार यांनी लगेच उपस्थित अधिका-यांना याचा जाब विचारत सदर मशीन दोन दिवसात सूरळीत करुन डायलिसिस प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. या दरम्याण सदर आजारातील रुग्ण उपचार घेण्याकरीता आल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात न पाठविता क्राईस्ट रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार करण्याच्या सुचनाही यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी वैद्यकीय अधिका-यांना दिल्या आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय हे गोर गरिबांच्या उपचारासाठीचे मुख्य केंद्र आहे. त्यामूळे येथील व्यवस्था नेहमी सुरळीत ठेवा अश्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here