बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

0
393

बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ! 

 

(प्रा.महेंद्र बेताल बल्लारपूर प्रतिनिधी)चंद्रपूर दि. 6 डिसेंबर 2020 ला बल्लारपूर येथे भारतरत्न प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बल्लारपूर येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक, न.प.बल्लारपूर, तथा बल्लारपूर पोलिस विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन करून मानवंदना देण्यात आली.
सर्वप्रथम सकाळी 8:00 वाजता. बल्लारपूर नगर पालिका येथील सीईओ. विजय सरनाईक आणि कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
बल्लारपूर येथील डॉ. जयप्रकाश तुंबडे,डॉ. नितीन गायकवाड, डॉ. योगेश मानवटकर,डॉ युवराज भसारकर,प्रा.डॉ. मिलिंद जांभुळकर,प्रा.महेंद्र बेताल, रत्नाकर सोनटक्के, रवि निमसरकर,प्रशांत रामटेके, महेंद्र कांबळे,निलेश गोरघाटे,धनंजय रिंगणे आणि इतर अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व ढाल अर्पण करून अभिवादन केले.
बल्लारपूर येथील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक मा.उमेश पाटील साहेब , API.मा.गायकवाड साहेब व पोलिस विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देण्यात आली.
तथा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व हजारोंच्या संखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सुरक्षित अंतर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. तसेच सर्व जनता व पोलिस विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम शांतपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here