विद्यार्थ्यांना वही व पेन वाटून महामानवास अभिवादन
बहुजन विचार बहु. संस्था खडसंगी चा उपक्रम

तालुका प्रतिनिधी
चिमूर.
विश्वभूषण डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादनपर सामाजिक उपक्रम म्हणून मागील चार वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करण्यात येते. ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बंदर( शिवापूर) येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्यात आले.
या वेळी मंचाकावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, माजी सरपंच बंडुजी तराळे, इंजि. भिवाजी मेश्राम, अंमलदार देवीदास रणदिवे,आशिष गजभिये, आशिष जीवतोडे, प्रशात मेश्राम, कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.या प्रसंगी उपस्थित पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी महामानवाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही व पेनाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमेध श्रीरामे,संचालन अनिरुद्ध वासनिक तर आभार सूरज गायकवाड यांनी मानले.या प्रसंगी संस्थेचे प्रतिक औतकर,राहुल धारने, मयूर मेश्राम,प्रतीक चिंचाळकर,आदित्य वासनिक,प्रदीप मेश्राम व अमोल कावळे उपस्थित होते.