माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

0
669

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

आडगांव बु: सर्वांना चे हवी हवीशी वाटणारी शाळा आयुष्याच्या वाटेवर आठवणीत हरवून जाते पण सर्वांच्याच मनात आठवणी कायम असतात. भुतकाळातील शाळेतील जुन्या अनुभवांना उजाळा देणारा उपक्रम स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी राबविला…

जिल्हा परिषद विद्यालय आडगांव बु: च्या तब्बल दहा वर्षांनंतर सन २००९-२०१० च्या दहाविचा वर्ग पुन्हा भरला. सन २००९-२०१० चे माजी विद्यार्थ्यी दिपक रेळे, दिपक घाईट व शेख साबिर यांच्या संकल्पनेतून काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेतील आठवणींना उजाळा देण्याकरिता पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.

यावेळी त्या वर्गातले बहुसंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. प्राचार्य आर जी जाधव यांचे प्रमुख उपस्थितीतीत वर्ग शिक्षक इंगळे, पी आर अढाऊ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे यांची उपस्थिती होती.

शिक्षकवृंदानी जुन्या आठवणी व अनुभव कथन करुण विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी भविष्यात येणाऱ्या अडचणीत एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. दहा वर्षांनी एकत्रित येत असलेल्या बरेच विद्यार्थ्यांनी आप आपल्या आठवणी कथन केल्या त्यावेळी सर्व वातावरण भाऊक झाले होते.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन रोशनी गाडगे व मनिषा धमके यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश तायडे यांनी केले. अशी माहिती दिपक रेळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here