येत्या १ डिसेंबरला पदवीधर मतदार संघाची निवडणूक चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज !

0
476

येत्या १ डिसेंबरला पदवीधर मतदार संघाची निवडणूक चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज !

किरण घाटे

१डिसेंबरला हाेवू घातलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन पुर्णता सज्ज झाल्याचे प्रत्यक्षात दिसून आले .दरम्यान जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी ग्रामीण व शहरी भागात एकुन पन्नास मतदान केन्द्र निर्माण केल्याचे समजते त्या मतदान केन्द्रासाठी २४०कर्मचा-यांची नियूक्ती करण्यांत आली आहे.

एका मतदान केन्द्रावर चार कर्मचारी कार्यरत राहतील .या शिवाय राखीव पथकात ४०कर्मचा-यांचा समावेश करण्यांत आला आहे .शिवाय प्रत्येक मतदान केन्द्रावर एक सूक्ष्म निरीक्षक मतदान प्रक्रियेचे काम बघणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी मतदार यादीत ३२हजार ७६१मतदारांचा समावेश असुन मतदारांनी आपल्या अमूल्य मताचा वापर करुन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे .सर्वच मतदान केन्द्रावर पिण्याच्या पाण्यांची साेय , विजपुरवठा , व दिव्यांगासाठी रैमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .

मतदान केन्द्रावर पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांसाठी पाेलिस पथक नियुक्त करण्यांत आले आहे . तर कर्मचा-यांना मतदान केन्द्रावर नेण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्यांत आली आहे .महाभयानक काेविडची परिस्थिती लक्षात घेता निर्मित केलेल्या प्रत्येक मतदान केन्द्रावर साबन , साँनिटायझर , पीपीई किट आदि आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यांत आलेले आहे . या व्यतिरीक्त सर्वच मतदान केन्द्रावर दाेन हेल्थ वर्कर तर तालुका स्तरावर वैद्यकीय चमु तयार ठेवली आहे .मतदानास अवघे काही दिवस शिल्लक असुन मतदानाची वेळ ही सकाळी ८ते सांयकाळी ५वाजे पर्यंत राहणार आहे .निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्यांसाठी सर्व नियुक्त कर्मचा-यांना वेळाेवेळी जिल्हा निवडणूक विभागाने प्रशिक्षण दिले आहे .नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील एसडीआे तथा तहसीलदार यांची नुकतीच या निवडणुकी बाबत एक बैठक पार पडली असल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here