पदवीधर चे उमेदवार संदीप जोशी यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातून मताधिक्य देवू …आमदार बंटीभाऊ भांगडीया

0
379

पदवीधर चे उमेदवार संदीप जोशी यांना विजयी Lकरण्यासाठी तालुक्यातून मताधिक्य देवू …आमदार बंटीभाऊ भांगडीया
तालुक्यातील कार्यकर्त्यांची घेतली आढावा बैठक

चिमूर

नागपूर पदवीधर मतदार संघातील भाजप, आरपीआय आठवले, बहुजन रिपबकलीन एकता मंच व खोरीप चे अधिकृत उमेदवार संदीप जोशी असून १ डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीत चिमूर तालुक्यातून संदीप जोशी यांना मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदवीधर मतदार पर्यत पोहचून संवाद साधून विजयी करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर तालुका भाजप कार्यकर्ता पदाधिकारी आढावा बैठकीत केले

चिमूर येथिल झालेल्या बैठकीत भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे, वसंत वारजूकर जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर, जीप सदस्य मनोज मामीडवार, भाजप जिल्हा महामंत्री तथा जीप सदस्य कृष्णा सहारे पस सदस्य अजहर शेख ,पस सदस्य प्रदीप कामडी, एकनाथ थुटे, जयंत गौरकर , संजय कुंभारे, समीर राचलवार, प्रकाश पोहनकर, अड नवयुग कामडी, सतीश जाधव रमेश कनचलवार, विवेक कापसे, शरद गिरडे, विनोद चोखरे, प्रवीण गणोरकर, नितीन गभणे , संदीप पिसे ,अविनाश बारोकर प्रफुल कोलते, सचिन फरकाडे, सचिन बघेल, प्रशांत चिडे बालू हेलवटकर,अमित जुमडे, गोलू भरडकर ,श्रेयस लाखे, नारायण चौधरी, विजय झाडे संजय नवघडे कैलास धनोरे गजानन गुळध्ये सौ मायाताई ननावरे सौ कनचलवार, सौ भारती गोडे सौ कल्याणी सातपुते आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

चिमूर तालुक्यातील पदवीधर मतदार यादी चे वाचन करून प्रमुख कार्यकर्त्यांना मतदार पर्यत जाऊन सवांद साधण्याची जबाबदारी देण्यात आली

आमदार बंटीभाऊ भांगडीया पुढे म्हणाले की संदीप जोशी हे युवा सुशिक्षित सुसंस्कृत सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले असून संदीप जोशी विजयी झाल्यास प्राधान्याने पदवीधर प्रश्न ,विद्यार्थी प्रश्न व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे तेव्हा चिमूर तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संदीप जोशी यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रत्यन करण्याचे आवाहन आढावा बैठकीत केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here