आमदार किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नाला आले अखेर यश !

0
454

आमदार किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नाला आले अखेर यश !

चंद्रपूरात सुरु होतेयं अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र !

राज्य सरकारने दिली मंजूरी !

💠चंद्रपूर 🟢🟣किरण घाटे💠🟢🟣
चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या सततच्या पाठपूराव्याला यश आले असून अनूसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात मंजूर झाले आहे. तसा आदेशही सरकारच्या वतीने पारीत करण्यात आला असल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे सदरहु मागणी संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यवहार करत उपरोक्त मागणी धरुन लावली होती.हे सर्वश्रुतच आहे
चंद्रपूर जिल्हात अनुसुचित जमातीच्या नागरिकांचे मोठ्या संख्येत वास्तव्य आहे. परंतु येथे जात पडताळणी केंद्र नसल्याने येथील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागत होते. त्यामूळे त्यांना प्रमाणपत्र काढणे त्रासदायक झाले होते. विशेष म्हणजे सदरहु कार्यालय उपलब्ध करुन देण्याबाबत 2019 ला आदेशही पारीत करण्यात आला होता. मात्र त्याची पुर्तता होत नव्हती. विद्यार्थी, शिक्षक, शासकीय नौकरदार, नागरिक, व निवडणूक लढविणारे उमेदवार यांची गैरसोय लक्षात घेता सदर जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यात यावे हा विषय आ. किशोर जोरगेवार यांनी चांगलाच लावून धरला होता. त्या संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह संबधित विभागांशी सतत पत्रव्यहार केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानूसार अनूसूचित जमातीचे जात पडताडणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here