ग्रामपंचायत भेंडाळा व युवा संकल्प संस्था द्वारा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
624

ग्रामपंचायत भेंडाळा व युवा संकल्प संस्था द्वारा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुखसागर झाडे

आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस ग्रामपंचायत भेंडाळा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरा करण्यात आले.
दर वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरे करतो. 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाले. पण त्याच्या पूर्वी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले होते. आणि या संविधानाचे निर्माता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि संविधान दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जनतेला संविधानाच्या प्रति जागरूक करणे होय. आणि समाजामध्ये संविधान बद्दल माहिती व्हावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. म्हणून आज संविधान बद्दल आदर बाळगून प्रतिज्ञा घेण्यात आले. त्या वेळी उपस्थित मा.सौ. वनिता मॅडम पोरेड्डीवार सरपंच ग्रामपंचायत भेंडाळा, मा.श्री. श्रीरंगजी मशाखेत्री पो.पा. भेंडाळा, मा. चंदा मॅडम कुंभरे ग्रामसेविका ग्रामपंचायत भेंडाळा, मा.श्री.विशुभाऊ सहारे,मा. वैशालीताई पोरेड्डीवार, युवा संकल्प संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष मा.राहुलजी वैरागडे, उपाध्यक्ष मा.चेतनजी कोकावार, श्री.संतोष खोंडेकर ग्रा.पं कर्मचारी, श्री.कुसरामजी पाणीपुरवठा कर्मचारी, कृष्णा भाऊ निकुरे आणि समस्त युवा संकल्प संस्था तसेच गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here