यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संविधान दिन साजरा!

0
521

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संविधान दिन साजरा!

🟪💠चंद्रपूर 🟣किरण घाटे🟣

२६ नोव्हेंबर रोजी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पूतळ्याला माल्यार्पण करुन संविधानाची शपथ घेण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका, वंदना हातगावकर, विद्यार्थी शाखेचे शहर प्रमूख अजय दुर्गे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कूळमेथे, बबलू मेश्राम, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, वैशाली रामटेके यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही चंद्रपूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्य शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही या निमीत्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ पोहचुन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले. संविधानीक न्याय हक्कांप्रती जागरुक राहण्याचे आवाहन याप्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here