पळसगांव येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाचन

0
456

पळसगांव येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाचन

विकास खोब्रागडे

पळसगांव (पि) -भारत देशात भारतीय संविधान लागू झालेल्या घटनेला ७० वर्षें पूर्ण झाली. यानिमित्त संविधान दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगांव च्या वतीने आज नालंदा बौद्ध विहाराच्या आवारात संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात येऊन. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले .संविधान दिनाच्या निमित्य पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी मान्यवर मंडळी अखिल भारतीय बौद्ध महासभा अद्यक्ष,दामोदर रामटेके व सचिव,प्रभाकर गजभिये महामाया महिला मंडळ च्या अद्यक्ष ,सुनीता भीमटे व सचिव सुनीता पाटील व बौद्ध उपासक उपसिका उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here