ओबीसी महामोर्चाला यंग चांदा ब्रिगेडचा पाठींबा

0
411

ओबीसी महामोर्चाला यंग चांदा ब्रिगेडचा पाठींबा

चंद्रपूर । किरण घाटे

संविधानदिनी निघाणा-या ओबीसी समाजाच्या महामोर्चाला आ. किशोर जोरगेवार अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडने पाठींबा दिला असून मोर्चा दरम्याण मोर्चात सहभागी होणा-या मोर्चेकरुंना गांधी चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे. या संदर्भात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह ओबीसी जनगणना समन्वय समितीचे बळीराज धोटे, सुर्यकांत खनके, अँड. पुरुषोत्तम सातपुते, अँड. दत्ता हजारे, प्रकाश देवतळे, डॉ. सुरेश महाकुलकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ओबीसी समाजाची स्वंतत्र जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरीता संविधान दिनी म्हणजेच उद्या २६ नोव्हेंबरला ओबीसी जनगणना समन्वय समीतीच्या वतीने शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोर्चाच्या माध्यमातुन समाजाच्या वतीने करण्यात येणाऱ्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आ. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच मोर्चात सहभागी समाजबांधवांचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत करण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याची सोयही येथे करण्यात येणार आहे. या मोर्च्याच्या नियोजनासाठी आज आयोजित बैठकीत उपस्थित ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी अध्यक्षा वंदना हातगावकर शहर संघटक कलाकार मल्लारप, विश्वजित शाहा, पंकज गुप्ता, अमोल शेंडे, सलीम शेख, राशीद हुसैन, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, चंदा इटनकर आदी पदाधिकार्याची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here