जिल्हा भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या सरचिटणीसपदी वंदना आगरकाठेची नियुक्ती!

0
385

जिल्हा भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या सरचिटणीसपदी वंदना आगरकाठेची नियुक्ती!

चंद्रपूर । किरण घाटे

सक्रिय राजकारणात असलेल्या मूल संजय गांधी निराधार याेजनेच्या भूतपूर्व अध्यक्षा तथा गडीसुर्ला या ग्रामीण भागातील मूळ निवासी असलेल्या वंदना आगरकाठे यांची नुकतीच भाजपा महिला आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असल्याचे व्रूत्त आहे. आगरकाठे यांचे स्व गावाशिवाय मूल तालुक्यातील अनेक गावात सामाजिक कार्यात माेलाचे योगदान राहिले आहे.
त्यांनी आज पावेताे ग्रामीण भागातील अनेक महिलांना न्याय मिळवुन दिला असुन आरंभीपासुनच त्या भाजप पक्षात कार्यरत आहे. तदवतचं अनेक पदावर त्यांनी काम बघितले असुन त्यांचे नियुक्तीचे अभिनंदन युवा कार्यकर्ते प्रविण माेहुर्ले, मुकेश गेडाम, शुभम समर्थ, तुषार ढाेलेसह अनेकांनी आज प्रत्यक्ष भेटुन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here