सूरज मडावीचे NEET परीक्षेत घवघवीत यश

0
603

सूरज मडावीचे NEET परीक्षेत घवघवीत यश

राजु झाडे

चंद्रपूर:- आदिवासी बहुल व दुर्गम अशा कोरपना तालुक्यातील वडगाव सारख्या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या सुरज वामनराव मडावी , वय 19 वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS प्रवेशासाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या NEET परीक्षेत 720 पैकी 377 गुण प्राप्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे MBBS प्रवेशासाठी पात्र ठरला.
सुरजचे आईवडील 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नांदेड येथे राहून त्यांनी परीक्षेची 5 तयारी केली. कोचिंग क्लास चे महागडी फी भरण्याचे पैसे नसल्याने त्याने नंतर स्वतःचे गाव गाठून घरीच जिद्दीने अभ्यास करून परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.अत्यंत हलाखीच्या परिस्तिथीत कठोर परिश्रम घेऊन सुरजने वडगाववाशीयांच्या मुकुटावर मानाचा तुरा रोवला आहे.

आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावपरिसरातील शासकीय कोट्यातून MBBS साठी प्रवेश मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला असून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे.गावकऱ्यांनी तसेच गावचे सरपंच मोहपतराव मडावी, उपसरपंच शंकर मोहितकर, अंगणवाडी सेविका मालतीताई पावडे यांनी सुरजचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here