सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूरचा ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
राजु झाडे

चंद्रपूर:- ओबीसी जनगणना समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी ओबीसी चा विशाल मोर्चा काढण्यात येत आहे. त्या मोर्चाचे विषय जातीनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणासाठी अश्या प्रकारे चे आणखी विशेष महत्त्वाचे मुद्दे त्यात आहेत त्याला आज दिनांक 22 नोव्हेंबर 2020 ला मातोश्री सभागृह, तुकुम, चंद्रपूर येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने ओबीसी जनगणना समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर च्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. धिरज तेलंग, सम्यक चे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष हर्षल कोठारकर, चंद्रपूर तालुक्याचे संघटक नरेश आलाम, कबीर घोनमोडे, मयूर डांगे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.