मनपात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती साजरी

0
231

मनपात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती साजरी

सदानंद खंडारे अमरावती जिल्हा प्रतिनिधी

गुरुवार दिनांक 19 नोव्‍हेंबर 2020 रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती निमित्‍य मा.महापौर चेतन गावंडे यांचे हस्‍ते श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. हारार्पण कार्यक्रमानंतर राष्‍ट्रीय एकात्‍मता दिना-निमित्‍ताने राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ घेण्‍यात आली.

यावेळी उपायुक्‍त सुरेश पाटील, अमित डेंगरे, कर मुल्‍य निर्धारण अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्‍त (मुख्‍यालय) नरेंद्र वानखडे, नगरसचिव मदन तांबेकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here