मोहाळाच्या महिलांना स्वस्त दरात किराणा

0
488

मोहाळाच्या महिलांना स्वस्त दरात किराणा

उमेद ग्रामसंघ मोहाळा चा उपक्रम

पोंभुर्णा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘उमेद’ च्या माध्यमातून महिलांचे ग्रामसंघ पोंभुर्णा तालुक्यातील गावागावात स्थापन करण्यात आले.यात मोहाळा या गावातही महिलांचा ग्रामसंघांने गावातील महिलांना स्वस्त दरात किराणा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्यात आले. राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या नावाने हे अभियान राबविले जात असताना त्याचे ‘उमेद’ असे नामकरण करण्यात आले. ‘उमेद’ या शब्दातच योजनेचा सगळा सार सामावला आहे. ‘उमेद’ ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट. ‘उमेद’ असेल तर माणूस पुन्हा उभं राहू शकतो. याच ‘उमेद’ने लाखो स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट धरायला लावली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथील उमेद च्या ग्रामसंघाने दिवाळी साठी गावातील महिलांना स्वस्त दरात किराणा मालाचे वितरण व्यवस्था केली आहे.त्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या उपक्रमात उमेद ग्रामसंघ मोहाळा च्या समुह संसाधन व्यक्ती वर्षा आत्राम, लेखापाल शुभांगी सोनटक्के, कृषी सखी रंजु कारेकर, अध्यक्ष पिदुरकर, सचिव सिमा देरकर, अनिता गौरकार, ईत्यादि महिलांनी सहभाग घेतला तर या उपक्रमाला राजेश दुधे, निलेश अहिरकर,विमल वाकुळकर यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here