चंद्रपूरची बाजारपेठ रंगबेरंगी रांगाेळ्यासह आकर्षक व मनाेवेधक आकाश दिव्यांनी सजली!
चंद्रपूर । किरण घाटे

आनंद व मंगलमय वातावरणाने उजळुन टाकणारा सण म्हणजे दीपावली !याच निमित्ताने चंद्रपूरातील बाजारपेठ पूर्णता सजली असल्याचे चित्र आज प्रत्यक्षात बाजारपेठेचा फेरफटका मारला असता दिसुन आले .बाजारात सध्या ग्राहकांची गर्दी वाढु लागली असुन विविध प्रकारचे दुकाने रस्त्यांच्या दुतर्फा लागली आहे रांगाेळ्या व आकाश दिव्यांच्या दुकाणांवर ग्राहक माेठ्या प्रमाणात खरेदीकरीता येत आहे. ख-या अर्थाने उद्या शुक्रवार दि.१३नाेव्हेबरला दिपावलीला आरंभ हाेत असुन बाजारातील विक्रीसाठी उपलब्ध असणारे आकर्षक व मनाेवेधक आकाश दिवे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे .कापड व्यवसाय व सराफा लाईन मध्येही सायंकाळी ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे .एव्हढेच नाही तर चंद्रपूरच्या बसस्थानकांवर देखिल प्रवाश्यांची गर्दी वाढु लागली आहे शासकीय कार्यालयाला शनिवार पासुन सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या आहे .त्यामुळे बाहेर गावचे अनेक अधिकारी व कर्मचारी स्वगावी यंदाच्या दीपावलीचा आनंद घेतील .यात तिळमात्र शंका नाही .जगभरात काेराेनाचे संकट निर्माण झाल्यानंतरही गेल्या चार पाच दिवसात अख्ख्या विदर्भात ब्लँक गोल्ड सिटी म्हणून आैळख असणां-या चंद्रपूर नगरीची बाजारपेठ अक्षरशा गर्दीने फुलली आहे हे मात्र तेवढेच खरे आहे .