२०२१च्या जनगणना मध्ये आेबीसीचा रकाना समाविष्ट करा!

0
370

२०२१च्या जनगणना मध्ये आेबीसीचा रकाना समाविष्ट करा!

आेबीसी आँर्गनायझेशन इंडिया तथा भावसार युवा एकता महिला आघाडीची मागणी!

चंद्रपूर । किरण घाटे

संपूर्ण देशात २०२१मध्ये जनगणना हाेवू घातली आहे .या जनगणनेत आेबीसीचा रकाना तसेच प्रवर्गचा कुठेही उल्लेख नाही .आगामी जनगणनेत आेबीसाचा रकाना समाविष्ठ करावा अशी मागणी आेबीसी आँर्गनायझेशन इंडिया तथा भावसार युवा एकता महिला आघाडीच्या वतीने नुकतीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातुन करण्यांत आली आहे.या देशात आेबीसी जातीची संख्या ३४७३च्या घरात असुन सन २०१३पासून आज पावेताे काेणत्याही सरकारने जनगणना केली नाही .भारतीय संविधानात ३४०कलमानुसार आेबीसी समाजाच्या कल्याणाची साेय केलेली आहे .परंतु सन १९३१पासून काेणत्याही सरकारला आेबीसी समाजाच्या कल्याणाची गरज वाटली नाही .राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आरक्षणाचे प्रमाण एक समान करावे असे प्रामुख्याने निवेदनात नमुद करण्यांत आले आहे . सन २०२१च्या जनगणना पत्रकात आेबीसाचा रकाना निर्माण केला नाही तर सर्व आेबीसी बांधव आगामी जनगणनेत सहकार्य किंवा सहभाग घेणार नसल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे . जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना आेबिसी आँर्गनायझेशन इंडियाच्या अध्यक्षा छाया बरडे, भावसार युवा एकता महिला आघाडीच्या अभिलाषा मैंदळकर, प्रिती लखदिवे, राजश्री क्षिरसागर, मीनाक्षी अलाने, कांता दखने, व इत्तर महिला सदस्या हजर हाेत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here