बल्लारपूरातील बालाजी वार्डमधील मुख्य रस्त्याचे व नालिचे बांधकाम तात्काळ करा : राजु झोडे
बालाजी वार्डातील समस्या दिवसोन दिवस वाढत आहे – मनोज बेले

प्रतिनिधी / राज्य महामार्ग लगत रस्त्याच्या बाजूला असलेल्या बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथील प्रकाश पटेल यांच्या घरापासून डॉक्टर किरण भगत यांच्या घरासमोरील रोड व नालीचे बांधकाम अजूनही अपूर्णच आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.नाल्यांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यामुळे बालाजी वार्डात दुर्गंधी पसरत असून रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्ता अत्यंत खराब आहे.रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून सदर रस्त्यावर किरकोळ अपघातही झाले आहेत.सदर बाब येथील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू जोडे यांच्या लक्षात आणून दिली. तात्काळ राजू झोडे यांनी बल्लारपूर येथील नगरपरिषदेला याबाबतचे निवेदन देऊन रस्त्याच्या नालीचे बांधकाम तात्काळ करावे अशी मागणी केली.
जर रस्त्याची व नालीचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात आले नाही तर वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी नगर प्रशासनाला दिला. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, मनोज बेले ,संपत कोरडे, भुषण पेटकर ,पंचशील तामगाडगे, अनिरूप पाटील, नरेश पिंगे,गुरु कामटे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.