युवा स्वाभिमान पार्टीची गोंडपिपरीत नविन शाखा निर्माण!

0
380

युवा स्वाभिमान पार्टीची गोंडपिपरीत नविन शाखा निर्माण!

युवा तरुणांकडुन मिळताेयं उत्तम प्रतिसाद !

किरण घाटे

गाेंडपिपरी । गाव तिथे शाखा या अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील युवा तरुणांचा व नागरीकांचा उत्तम प्रतिसाद स्वाभिमान पार्टीला मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभर दिसू लागले आहे .दरम्यान युवा स्वाभिमान पार्टीचे युवा नेता सुरज ठाकरे यांचे पुढाकारातुन नविन शाखा निर्माण हाेत असुन या शाखा निर्मितीसाठी त्यांचा सातत्याने चंद्रपूर जिल्हा दाैरा सुरु असल्याचे या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आज या प्रतिनिधीस राजूरा मुक्कामी भेटी दरम्यान सांगितले.
रविवार दि.७नाेव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्या मधील शेतकरी, शेतमजूर व कामगार यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश केला.
यावेळी गोंडपिंपरी शहरातील सफाई कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .जिल्ह्यामध्ये प्रभावी यूवा नेत्रूत्व अशी आेैळख असलेले सुरज ठाकरे यांनी अन्याय विराेधात सतत आपला आवाज बुलंद केला आहे.आज असंख्य यूवा कार्यकर्त्यांची फाैज त्यांचे पाठीशी उभी आहे .गाेंडपिपरी येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रामुख्याने स्वाभिमान पार्टीचे राहुल चव्हाण, सुनील चव्हाण, निखिल बजाइत, अजवान टाक, कुकू सोनाई, मोहब्बत खान, नदीम सय्यद, प्रकाश वानखेडे, बबलू चव्हाण, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here