नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उचित शासकीय मदत मिळवून देवू : आमदार सुभाष धोटे

0
374

नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उचित शासकीय मदत मिळवून देवू : आमदार सुभाष धोटे

राजुरा । राहुल थोरात (तालुका विशेष प्रतिनिधी)

कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करून, सद्गुरू बाजीराव महाराज यांना अभिवादन करून मा. खासदार बळूभाऊ धानोरकर तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथील रस्ता व सावलहीरा मांगलहिरा जांभुळदरा परिसरातील ९ पुलांचे व रस्त्यांचे उद्घाटन केले. यावेळी आमदार धोटे यांनी शेतकऱ्यांच्या कापूस पिकांवर बोंड अळी आल्यामुळे नुकसान झालेल्या उत्पादनाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई मिळवुन देऊ असे आश्वासन दिले. शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू अशी हमी दिली.
या प्रसंगी मा. अरुण धोटे राजुरा नगराध्यक्ष राजुरा, श्रीधरराव गोडे सभापती कृ.उ.बा.स.कोरपना, विजयराव बावणे, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, रुपाली तोडासे सभापती प. स. कोरपना, सोमलाल कोचारे सरपंच दुर्गाडी, सिंधुताई आस्वले उपसभापती, विठ्ठलराव थिपे अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी कोरपना, कल्पना पेचे, विनाताई मालेकर जि.प. सदस्य, ललिताताई गेडाम अध्यक्ष तालुका महिला कॉंग्रेस कमिटी कोरपना, उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे माजी जि.प. सदस्य, सुरेश मालेकर जेष्ठ नेता, शैलेश लोखंडे अध्यक्ष तालुका युवक कॉग्रेस कोरपना, विक्रम येरणे गट नेता तथा सभापती बांधकाम न. प. गडचांदूर, गणेश गोडे, भाऊराव चव्हाण रसूल पटेल, अनिल गोंडे उपसरपंच जेवरा, यादव धरणे यासह कॉंग्रेस कार्यकर्ते व गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here