एसडीआे तथा जात पडताळणी समिती असंवैधानिक पणे प्रदान करीत असलेले जात प्रमाण पत्र तथा जात वैधता प्रमाणपत्र देणे बंद करा!
आदिवासी आरक्षण बचाव क्रूती समितीची एकमुखी मागणी!
चंद्रपूर । किरण घाटे
काेणतेही शासकीय आदेश नसतांना तथा उच्च न्यायालयाचे निर्णय फक्त याचिका कर्त्यांसाठी असतांना एसडीआे तथा जात पडताळणी समिती (असंवैधानिकणे प्रदान करीत) जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र त्यांचे स्तरांवरुन वितरीत करीत आहे ते तातडीने बंद करण्यांत यावे, या प्रमुख मागणीसाठी आज गुरुवार दि.६नाेव्हेंबरला दुपारी ४वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तथा आदिवासी विभागाचे मंत्री के.सी. पाडवी यांना आदिवासी आरक्षण क्रूती समितीच्या एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
या वेळी विविध आदिवासी संघटनेचे शेकडाे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित हाेते. दरम्यान आजच्या शिष्टमंडळात प्रामुख्याने प्राचार्य शांताराम उईके, रंजना किन्नाके, लता शेडमाके, बंडु मडावी, प्रमाेद बाेरीकर, विजय ताेडासे, मधुकर काेडापे, क्रूष्णा मसराम, सुधाकर कन्नाके, माराेती जुमनाके, विजय कुमरे यांचा समावेश हाेता.