कोरोना जनजागृती काव्यधारा – १५
कवी – चंद्रशेखर कानकाटे, वरोरा

कविता : माझे कुटुंब माझी जबाबदारी
सारीकडेच दिसते मृत्यूचे तांडव
कोरोना व्हायरस हा भयकारी
काळजी घेवुन पुढे सतर्क राहू
माझे कुटुंब माझी जबाबदारी ….१
वेगळे रुप याचे दिसते कधी
चौकात रंगती गप्पा भारी
नको विश्वास कोणावरही
माझे कुटुंब माझी जबाबदारी….२
लस बनविण्या स्पर्धा वाढली
प्रत्येकाची वेगळीच ललकारी
थांबा..! वाट पहा! ही मजबूरी
माझे कुटुंब माझी जबाबदारी….३
उपायांची खैरात सांगे जगती
‘आत्मबल जागवा ‘ मात्रा खरी
उगाच भीतीने घाबरू नका ना
माझे कुटुंब माझी जबाबदारी…..४
सोपा उपाय …इलाज भारी
हात धुवा नि मास्क तोंडावरी
संवाद साधाया अंतर ठेवू दारी
माझे कुटुंब माझी जबाबदारी….५
छुपा रुस्तुम शत्रूच जगताचा
डोळी धूळ फेकून करतो वारी
तुम्हीच तुमचे रक्षक जाणून
माझे कुटुंब माझी जबाबदारी…..६
भूल होता थोडी संकट भारी
जीवितास हानी, मृत्यू समोरी
मात करण्या ‘चंद्र’ हा पुकारी
माझे कुटुंब माझी जबाबदारी…७
कवी : चंद्रशेखर कानकाटे, वरोरा
संपर्क- ९८२२६१०२९४
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)