गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

0
485

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

राजुरा तालुक्यातील कडोली येथील घटना

राजुरा : तालुक्यातील कडोली येथे आज सकाळी 35 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर इसमाचे नाव अनिल देवाळकर असून तो गोवरी येथील रहिवासी आहे.
स्थानिक अस्वले यांच्या शेतात झाडाला सदर शेतकरी गळफास घेतलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला. सदर शेतकऱ्याच्या आत्महत्येमागचे कारण अजून कळू शकले नाही. राजुरा पोलिसांनी सदर इसमाचे शव शवविच्छेदनासाठी नेले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here