ब्रम्हपुरीत पार पडली ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक! अनेकांची उपस्थिती !
किरण घाटे
चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना समन्वय समिती तर्फे संविधान दिनी दि. 26 नोव्हें .20 ला आयोजित ओबीसींच्या विशाल मोर्चाच्या आयोजना संदर्भात ब्रम्हपुरी येथील संत तुकाराम तलमले महाविद्यालयात दुपारी 1 वाजता बैठक संपन्न झाली.या बैठकीत ब्रम्हपुरी तालुक्यातील गावागावांतून ओबीसी समाज व्दारे 26 नोव्हें च्या मोर्चात सहभागी होण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात आले. उपस्थितांना ओबीसी समन्वय समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे तथा संयोजक ऍडव्हाकेट प्रशांत सोनुले, भाऊरावजी राऊत, प्रा. नामदेवराव जेंगठे व जगदीश उर्फ मोंटू पिलारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन युवा कार्यकर्ते राहुल मैंद यांनी केले. सदरहु
बैठकीला भूमिपुत्र ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर, वेकोलि एससी, एसटी, ओबीसी कॉउंसिल चे भास्कर सपाट, वैभव तलमले, स्वप्नील राऊत, किशोर प्रधान, केवलराम मैंद, रामदास टोंगे, विलास दुपारे, देवनंदन ठेंगरी, सुनील पाथोडे, अतुल दर्पे, विष्णू मोहुर्ले, रोशन मेंढे, गोवर्धन दोनाडकर, आदि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
