कोरोना जनजागृती काव्यधारा – १२

0
403

कोरोना जनजागृती काव्यधारा – १२

कवी – प्रविण आडेकर, भद्रावती

कविता : सुरक्षीत माझे गाव

कुटुंब माझे सुरक्षित आहे
सुरक्षित माझा गाव
कोरोनाच्या महामारीला
निर्धाराने पळवून लाव || धृ ||

लक्षण दिसता अंगदुखीची
सर्दी खोकला अन् तापाची
तत्पर आहे आरोग्य यंत्रणा
आमच्या आरोग्यासाठी
भीती कशाची मनात ठेवतो
सत्य सांगतो राव……|| १ ||

शासन आहे कटिबद्ध आमचे
प्रशासन आले दारा
आरोग्य दुतांचे स्वागत करतो
आम्ही आमच्या घरा
सहकार्याचा संकल्प घेऊन
हानु कोविडचा डाव……|| २ ||

सुरक्षित अंतर ठेवून वागू
सुरक्षित राहू सारे
घेऊ काळजी आपण आपली
बांधू मास्क सारे
हात धुवून मिटवून टाकू
दृष्ट कोरोनाचे नाव……|| ३ ||

कवी : श्री प्रवीण आडेकर, भद्रावती
संपर्क- ८९२८१५४००४

 

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

•••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here