नामवंत सहज सुचलच्या संयाेजिकापदी अधिवक्ता मेघा धाेटे तर काव्यकुंजच्या संयाेजिकापदी मायाताई काेसरेंची सर्वानुमते निवड !
चंद्रपूर किरण घाटे :-महाराष्ट्रातील नामवंत (महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असणां-या )सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका पदी विदर्भातील सुपरिचीत जेष्ठ साहित्यिका तथा अधिवक्ता मेघा धाेटे( राजुरा ) काव्यकुंजच्या संयाेजिका मायाताई काेसरे(राजुरा सास्ती )तर सहज सुचलच्या साेशल मीडीया ग्रुपसाठी प्रभा अगडे (नागपूर) यांची आज सर्वानुमते नियुक्ती करण्यांत आली.या शिवाय सहज सुचल साठी सहसंयाेजिका म्हणुन अनुक्रमे कविता चाफले (दुर्गापूर चंद्रपूर )ज्योति विलास मेहरकुरे (चिमूर नेरी )जास्मिन शेख( चंद्रपूर, )प्रांजली दुधे (चिमूर माेटेगांव )सराेज हिवरे(राजूरा) तथा पूनम रामटेके (चंद्रपूर) यांची निवड करण्यांत आली. येत्या एक जानेवारीला सहज सुचल ग्रुप ४थ्या वर्षात पदार्पण करीत असुन अनेकांनी उपराेक्त या निवडीतील नवनियुक्त महिलांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहे .🟣🟡दरम्यान पथ्राेटच्या पुरस्कार विजेता जेष्ठ लेखिका विजया भांगे अनेक आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पाचवडच्या कु .अर्चना सुतार , वयाेव्रूध्द हैद्राबादच्या जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी ,काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर ,(मूल) मंजुषा दरवरे चंद्रपूर , अर्जुमन शेख बल्हारपूर , वर्षा शेंडे ,चिमूर शंकरपूर, गीता बाेरडकर नागपूर, प्रा.वंदना ढवळे बुलठाना , संजीवनी धांडे राजूरा, क्रूतिका साेनटक्के राजूरा ,वंदना आगरकाठे मूल, श्रूती उराणकर कणकवली , रजनी रनदिवे मुंबई , हीरा दारुंडे आेरंगाबाद , रक्षा नगराळे यवतमाळ ,कुसुम अलाम गडचिराेली , रजनी पाेयाम वणी, स्मिता मेहत्रे नागपूर, उज्वला पाटील नागपूर आदिं महिलांनी या नियुक्त्यांचे स्वागत केले आहे .