कोरपना – येथील एका प्राध्यापकाच्या घरच्या कोंबडीने चार पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याने दिल्याने सर्वत्र कुतूहुल व्यक्त होत आहे.
कोंबडी व कोंबडीच्या पिल्याला सर्वसाधारणतः दोन पाय असतात. मात्र कोरपना येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विलास भोयर यांच्या घरी त्यांच्या संगोपनातील कोंबडीने चार पायाच्या पिल्लाला जन्म दिला. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.ते कोरपना तील वॉर्ड क्रमांक तीन मधील पाण्याची टाकीजवळ वास्तव्यास असतात. परंतु त्याचा जीवन कालावधी केवळ पाच तासच राहिल्याने ऐकाव तर नवलच या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे