स्वस्त धान्य दुकानातून नित्कृष्ट दर्जा च्या अन्नधान्याचे वाटप:-
मोफत अन्नधान्याच्या नावावर जनतेची फसवणूक बोगस अन्नधान्य व दाळीचे वाटप
सुखसागर झाडे
चामोर्शी:- कोरोणाच्या संकटात शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चालू करून गडचिरोली जिल्ह्यात मोफत अन्नधान्याचे स्वस्त धान्य दुकाना मार्फत रेशन कार्डधारकांना वाटप केल्या जात आहे. परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत चामोर्शी तालुक्यात निकृष्ट दाळ चामोर्शी येथील स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आली याची माहिती चामोर्शी शहरातील नागरिकांनी श्री आशिषभाऊ पिपरे सामाजिक कार्यकर्ते यांना दिली याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांसह स्वस्त धान्य दुकानात जाऊन अन्नधान्याची तपासणी केली असता या दुकानात निकृष्ट दर्जाचे दाळ आढळून आली व स्वस्त धान्य दुकानदारांना विचारणा केली असता दुकानदारांनी गोडावूनमधून जसा माल आला तसा मी विक्री करीत आहे असे सांगितले या खराब मालाची सूचना अन्नपुरवठा अधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगितले आमचे प्रतिनिधी अन्नपुरवठा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता खराब निघालेले धान्य बरेचसे दुकानदार वापस केले पण या दुकानदारांनी खराब धान्याची माहिती न देता व वापस न करता दुकानदाराच्या हलगर्जीपणाने वाटप केले. तसे दुकानदारास जेवढे खराब धान्य आहेत ते वापस करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर दिली निकृष्ट धान्य पुरवठा करणार्या कंत्राटदारावर व हलगर्जीपणा करुन निकृष्ट दर्जाची धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी चामोर्शी शहरातील नागरिकांकडून होत आहे.