अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे नोकारी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

0
37

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे नोकारी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोतालील गांवातील विकासाकरीता सतत धडपड करीत असते.

आज नोकारी येथील जिल्हा परिषद शाळेत ,आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

त्यामध्ये योगा प्रशिक्षक पन्नी मिश्रा यांच्याद्वारे स्वस्तिक आसन, अलोन,विलोन,ताडासन, बज्रासन, त्रिकोणासन, उंटकासन आणि प्राणायाम कारविण्यात आले तर योगा बद्दल मोलाचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

या कार्यक्रमात नोकारी गावचे सरपंच मनीषा पेंदोर ,उपसरपंच वामन तुराणकर,शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर व सहाय्यक शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गांवातील महिला असे एकूण ५२ नागरिक उपस्थित होते.

यावेळी गावचे उपसरपंच यांनी सर्व उपस्थिताल मार्गदर्शन करीत योगा मुळे काय फायदा होतो व त्यापासून आपण आजारानं सुद्धा कसे दूर ठेवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलेत. तर गावचे सरपंच यांचे द्वारा योगा प्रशिक्षक पन्नी मिश्रा याना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सर्व उपस्थितांना फळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या योग दिनाच्या आयोजन बद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी माणिकगढचे आभार व्यक्त केलेत तर सी. एस. आर. टीम माणिकगढ सोबत मिळून या कर्यक्रमाला यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here