हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे मालकावर प्राणघातक हल्ला

0
100

हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे मालकावर प्राणघातक हल्ला

राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथील घटना

 

राजुरा, ११ जून :- वरुर रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे काल रात्री दहा वाजेच्या आसपास मालकावर प्राणघातक हल्ला झाला असून मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

काल रात्री १० वाजेच्या आसपास मद्य प्राशन करण्यासाठी आलेल्या इसमाने बिलावरून शुल्लक वादाची सुरवात झाली. यामुळे नशेत असलेल्या ग्राहकाने बार मध्ये नासधूस करून बार चालक नारायण मंथापुरवार व त्यांचा मुलगा वेंकटेश मंथापुरवार यांना मारहाण केली. यावेळी मुलगा व्यंकटेश याच्या डोक्यावर तीसहून अधिक दारूच्या बाटल्या फोडल्याने तो रक्तबंबाळ झाला असून चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.

बिअर बारची तोडफोड, मालक गंभीर जखमी असून बारचे मोठे नुकसान झाले आहे. सद्या राजुरा पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here