वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांचा मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

0
54

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांचा मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

Loksabha Election 2024
चंद्रपूर, २७ मार्च :- वंचित बहुजन आघाडीने पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी राजेश बेले यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीची लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर…
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी राज्यातील पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे वंचितने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात भंडारा/गोंदिया करिता संजय केवट, गडचिरोली करिता हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर करिता राजेश बेले, बुलढाणा करिता वसंतराव मगर, अकोला करिता प्रकाश आंबेडकर, अमरावती करिता प्राजक्ता पल्लेवाण, वर्धा करिता प्रा. राजेंद्र साळुंखे तर यवतमाळ/वाशिम करिता खेमसिंग पवार असे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here