पैनगंगा परियोजना येथील कोळसा कामगारांचे शिवजयंतीच्या निमित्ताने समाज ऋण फेडण्याचे प्रशंसनीय कार्य

0
128

पैनगंगा परियोजना येथील कोळसा कामगारांचे शिवजयंतीच्या निमित्ताने समाज ऋण फेडण्याचे प्रशंसनीय कार्य

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ ला पैनगंगा परियोजना येथे कॅन्टीनच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपक्षेत्रीय प्रबंधक चेतन कुमार जैन यांनी भूषविले. मंचावर त्यांच्या समवेत श्री भागवत बुवाडे, उत्खनन विभागाध्यक्ष, श्री सीताराम प्रसाद, विद्युत यांत्रिकी विभागाध्यक्ष तसेच श्री राजवल्लभ सिंह, खनन विभाग हजर होते. तसेच आमंत्रित युवा वक्ता श्री आकाश कडूकर हजर होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर शिवजन्मोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष श्री गुलाब उपासे व इतर कार्यकर्त्यांद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सर्व क्षेत्रीय व उपक्षेत्रिय श्रमीक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

कार्यक्रमांमध्ये शिवजन्मोत्सव सेवा समिती पैनगंगा परियोजना द्वारा प्रेरणा अंध विद्यालय, घोटनिंबाळा येथील व्यवस्थापिका श्रीमती रजनी भगत आणि श्री विलास कहाळे सर यांना अंध विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले होते.

शिवजन्मोत्सव सेवा समिती यांच्यातर्फे दोन बुक सेल्फ भेट देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये आमंत्रित युवा वक्ता श्री आकाश कडुकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर माहिती दिली. शिवछत्रपतींना खरीखुरी मानवंदना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री चेतन कुमार जैन यांनी सुद्धा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या शिवजयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुशांत वाघ यांनी उत्कृष्टरित्या केले. त्याचबरोबर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री श्रीकांत सावे यांनी केले. हा कार्यक्रम सुरळीत व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमांमध्ये हर्षल निखाडे, त्रंबक कोंगरे,अनुप जोगी, साई ओदलकोंडावार, पंकज गौरकर, सागर जेनेकर, विवेक पडवेकर, विशाल ऑस्कर, आशिष बोबडे, अभय बर्डे, वैभव दिवे, श्रीकांत पिंपळकर, शंकर गंगाधरे, अजय चटकी, अरविंद उलमले, महेंद्र देठे या कामगारांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here