ओबीसी समन्वय समिती, राजुरा तर्फे सायकल यात्रेचे जोरदार स्वागत

0
397

ओबीसी समन्वय समिती, राजुरा तर्फे सायकल यात्रेचे जोरदार स्वागत

नगराध्यक्ष अरुण धोटे व कुंदाताई जेनेकर यांची प्रमुख उपस्थिती

राजुरा- दि. 25 ऑक्टोबर 2020 ला ओबीसी समन्वय समिती, राजुरा तर्फे ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी काढण्यात आलेल्या सायकल यात्रेचे अतिथी गृह, राजुरा येथे हार, पुष्पगुच्छ व ओबीसी जनगणनेचे नारे देत जोरदार स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सभापती पं. समिती राजुरा कुंदाताई जेनेकर, तसेच ओबीसी, अनुसूचित जाती-जनजाती, अल्पसंख्य समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी समाजाने जनगणनेसाठी प्रण घ्यावा व सरकार असे ऐकत नसेल तर हंटर दाखवून जनगणना करून घ्यावी लागेल असे मत अरुण धोटे यांनी व्यक्त केले. महिलांचे प्रतिनिधित्व करीत कुंदाताई जेनेकर यांनी 2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही याबद्दल खंत व्यक्त करीत सायकल यात्रेला आपला पाठींबा दर्शविला.
सायकल रॅली अतिथी गृहापासून पुढे संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून महापुरुषांच्या नावाचा जयघोष व जय ओबीसी, जय संविधान, ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे असे नारे देत गडचांदूर मार्गे चंद्रपूरला परत गेली.
प्रा. अनिल डहाके यांनी त्यांच्या पत्नीच्या ते मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सायकल रॅलीचा प्रारंभ केला. आज दहाव्या दिवशी ही रॅली चंद्रपूर-नांदगाव-विसापूर-बल्लारपूर असा प्रवास करीत राजुरा येथे पोहचली. या ओबीसी जनगणना सायकल यात्रेत प्रा. अनिल डहाके सोबत सुनील वडस्कर, 70 वर्षीय हरिदास पाऊणकर, प्रशांत खुसपुरे, शंकर मसराम व संकेत जयकर उपस्थित होते.
या सायकल यात्रेचे हर्षोल्लासात स्वागत करण्यासाठी उत्पल गोरे, सूरज गव्हाणे, दिनेश पारखी, केतन जुनघरे, रितिक बुटले, प्रणव बोबडे, निलेश बोन्सुले, अंकुश मस्की, महेश राठोड, स्वप्नील बाजुजजवर, सुरज भामरे, प्रतीक कावळे, इर्शाद शेख, झाकिर हुसेन, आसिफ सय्यद, रियाज शेख, संतोष देरकर, मनोहर बोबडे, सुभाष अडवे, रामरतन चापले, मधुकर मटाले, संदीप कोंडेकर, भास्कर वाटेकर, सुधीर ढवस, सुधीर झाडे, संतोष पावडे, संजय बोभाटे, गजानन वासाड, साईनाथ परसुटकर, दुशांत निमकर, सुभाष पावडे, पुंडलिक उरकुडे, गिरीश चन्ने, किसन बावणे, लक्ष्मण घुगुल, वामन साळवे, संतोष रामगिरवार, निखिल घुगुल, केशव बोढे, बाबुराव मुसळे, श्रीकृष्ण वडस्कर, आशिष करमरकर उपस्थित होते.
सायकल यात्रेच्या यशस्वीतेसाठी उत्पल गोरे व सुरज गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सूरज गव्हाने व सूत्रसंचालन केतन जूनघरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here